Wednesday, 8 August 2018

परत एकदा प्रेम करावस वाटतं.....

*परत एकदा प्रेम करावस वाटतं.....*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

काळाला फिरवुन मागे , आठवणीत रमावस  वाटतं..
हातात हात घेऊन बागेत फिरावंस वाटतं,
दुरावलेल्या मनाला जुळवावस वाटतं..
परत एकदा प्रेम करावस वाटतं..... !!1!!

मॉर्निंग वाल्क ची गपशप चालवावी वाटतं ,
गुड नाईट , गुड नाईट दहा दहा वेळा म्हणावसं वाटतं..
मनात दाटलेल्या आभाळांना मोकळं करावस वाटतं,
परत एकदा प्रेम करावस वाटतं.....!!2!!

लपत छपत तूला बघावस वाटतं,
कुशीत बसवून भरवावस वाटतं..
' निस्वार्थ आहे हो प्रेम ' जगाला ओरडून सांगावस वाटतं,
हाकेला तुझ्या हजर रहावस वाटतं..
परत एकदा प्रेम करावस वाटतं..... !!3!!

घरातल्या एका कोपऱ्यात रामावस वाटतं,
रमता रमता समरणांनी भिजावस वाटतं..
गारठलेल्या रात्रीत तुझ्यासाठी कुडत जागावस वाटतं,
पाण्याच्या होळीला परत खेळावस वाटतं..
परत एकदा प्रेम करावस वाटतं.....!!4!!

तक्रारी तुझ्या मान्य आहेत साऱ्या,
नकळत विश्व् बदलतं, अर्थ बदलतात..
मन मात्र सातत्याने गुंतलेलं असत,
गुंतलेल्या मनात अधिक गुंतावस  वाटत..
परत एकदा प्रेम करावस वाटतं..... !!5!!

गुड्डू 🖋

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹