Friday, 9 May 2014

वेळेचं महत्व मला नाही कळलं????????

वेळेचं महत्व मला नाही कळलं????????

वेलेनि आज मलाच मागे टाकलं......
कारण, वेळेचं महत्व मला नाही कळलं.

आयुष्याचं गणित थोडक्यात चुकलं......
कारण, वेळेचं महत्व मला नाही कळलं.

खरंच माणूस मोठा कि वेळ? असं कोडं मला ऐथे पडलं.....
कारण, कुणी म्हटलं कि वेळेचं महत्व मला नाही कळलं.

M B A मध्ये शिकलेलं TIME MANAGEMENT हि आज कामी नाही पडलं......
कारण, वेळेचं महत्व मला नाही कळलं.

माणसाने घडवलेल्या वेळेने आज माणसालाच हरवलं......
कारण, म्हणे वेळेचं महत्व मला  नाही कळलं.

प्रफ़ुल्ल